in

…आत्महत्येचा मला व्हिडीओ पाठव, आयेशाचे पतीसोबतचे शेवटचे संभाषण पोलिसांच्या हाती

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या 23 वर्षीय आयेशाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ पाहून नेटकरी हळहळले होते. तसेच या नेटकऱ्यानी तिच्या पतीविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आयेशा हुंडाबळीचा शिकार ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आयेशा आणि पती आरिफमध्ये झालेलं ७० मिनिटांचं संभाषण पोलिसांच्या हाती लागलं आहे ज्यामध्ये आरिफ ‘जा मर आणि त्याआधी मला व्हिडीओ पाठव’ असं सांगताना ऐकू येत आहे.

अहमदाबाद येथील 23 वर्षीय आयेशाने आत्महत्या करण्याआधी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि मनातलं दु:ख पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. आयेशाने व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर साबरमती नदीत उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं.त्यानंतर राजस्थानचा रहिवासी असणाऱ्या आरिफला पाली येथून अटक करण्यात आली. आरिफचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आयेशाच्या कुटुंबाचा आरोप आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

पोलिसांनी आरिफचा मोबाइल जप्त केला आहे ज्यावरुन त्याने आयेशासोबत शेवटचा संवाद साधला होता.दरम्यान आयेशा आणि पती आरिफमध्ये झालेलं ७० मिनिटांचं संभाषण पोलिसांच्या हाती लागलं आहे ज्यामध्ये आरिफ ‘जा मर आणि त्याआधी मला व्हिडीओ पाठव’ असं सांगताना ऐकू येत आहे. पोलीस सध्या आयेशा आणि आरिफच्या मोबाइलमधून अजून पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान कॉल रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली असून कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs England 4th Test | टीम इंडिया अवघ्या काही धावांनी पिछाडीवर

शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना विरोध कसा? बाबरी मशिदीवरून काँग्रेसचे एका दगडात दोन पक्षी!