अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाबद्दल सर्वकडे चर्चा होती. आता या चित्रपटाविषयी एक बातमी समोर आली असून क्रिती सेनॉनने अक्षय कुमारसोबतचे तिचे शूटिंग पूर्ण करून घेतले आहे. क्रितीने अक्षय कुमारसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

हा फोटो शेअर केल आहे. या फोटो सोबत “अक्षय कुमारसोबतचा माझा ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचा प्रवास संपला आहे. या चित्रपटाचे शेड्यूल माझ्या आयुष्यातील कमालीचे राहिले आहे. शूटिंग करतानाची मस्ती ते खेळ आणि जेवणाचा आनंद घेताना हे शूटिंग कधी संपले ते कळालेच नाही. आम्ही एक परिवार झालो होतो. निरोप नेहमीच दु:खद असतो पण आपण लवकरच सिनेमागृहात भेटू.” असे कॅप्शन दिले आहे.
‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.’बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.
Comments
Loading…