in

भारताच्या बालाकोट एअर स्ट्राइकला आज दोन वर्ष पूर्ण

भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राइकला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पुलवामा दहशवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने हा एअर स्ट्राइक केला होता.या दहशतवादी हल्ल्यासाठी नेमकं कोणते कोडनेम वापरले गेले होते या संबधित माहिती आता समोर येत आहे.

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे साडे तीन वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना विशेष आरएएक्स क्रमांकावर फोन केला आणि ‘बंदर मर गया है’असं सांगितलं. या संदेशाचा अर्थ बालाकोटमधील ट्रेनिंग कॅम्प भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उद्ध्वस्त केलं आहे, असा होता .यावेळी कोडनेम मुद्दाम बंदर असे ठेवण्यात आले होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारत बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा उल्लेख करत आहे असं वाटून त्यांचा गोंधळ व्हावा यासाठीच बंदर हा कोड निवडण्यात आला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेलं हे उत्तर होतं.

पाकिस्तान सैन्याचा गैरसमज होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी राजस्थानामधून उड्डाण केलं होतं. जेणेकरुन, पाकिस्तान त्यांच्या हवाई शक्तीचा वापर बहावलपूरच्या दिशेने करेल. जाणूनबुजून पाकिस्तानची दिशाभूल करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली होती. त्याचवेळी हवाई दलाच्या फायटर विमानांनी मिराज-२००० मधून ९० किलो वजनाचे स्पाइस २००० बॉम्ब बालाकोटमधील जैशच्या तळावर टाकले. हा हल्ला झाला, तेव्हा पाकिस्तानी फायटर जेट्स भारताच्या फायटर विमानांपासून १५० किमी दूर होती. भारतीय वेळेनुसार साडे तीन वाजण्याच्या सुमारास मिसाइल्समधून पाच बॉम्ब तळावर टाकण्यात आले.

बालाकोटमध्ये फक्त मशिदीला अजिबात धक्का लावण्यात आला नाही. तिथे नमाजची तयारी सुरु झाली होती. स्ट्राइक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व वरिष्ठ मंत्री, पीएमओ अधिकारी, कॅबिनेट सचिव, गृहसचिव, परराष्ट्र सचिव, गुप्तचर यंत्रणा प्रमुख, हवाई दल प्रमुख, रॉ सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत जाहीरपणे भारतीय गुप्तचर यंत्रणा खासकरुन रॉ आणि हवाई दलाच्या प्रमुखांचं अभिनंदन केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

सोने, चांदीच्या किंमतीत घट