in

‘बांगलादेशच्या निर्मितीत इंदिराजींचीच भूमिका महत्वाची, ‘त्यांनी’ इकडे नाही तर, तिकडे मान्य केले…’

बांगलादेशच्या निर्मितीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मोठी भूमिका होती, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकडे नाही, पण तिकडे बांगलादेशात मान्य केले आहे, असेच म्हणावे लागेल, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

आज बांगलादेशने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती पाहून आता मोदींनी आपल्याकडेही सुधारणा कराव्यात, अशी कोपरखळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमध्ये मारली. विरोधी पक्षाने सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलाबाबत जी राळ उठवली आहे, त्यामागचा बोलवता धनी कोण आहे हे आमच्या लक्षात आले आहे. अजूनही याबाबतचे खुलासे लवकरच समोर येतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

फोन टॅपिंगप्रकरणी मुख्य सचिवांच्या अहवालाबाबत अविश्वास दर्शविणे चुकीचे आहे, यापदावर काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाचा मोठा अनुभव असतो, त्यामुळे तो अहवाल त्यांनीच दिला आहे. या सर्व गोष्टींवर भारतीय जनता पक्ष जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोपही थोरात यांनी यावेळी केला.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : रुग्णांचा आकडा अद्याप 35 हजारपेक्षा जास्तच, मृतांचा आकडाही वाढला

वसई विरार महानगरपालिका भाजपा लढविणार स्वबळावर, प्रसाद लाड यांची घोषणा