in

पंतप्रधान मोदींचा दौरा संपताच बांगलादेशात मंदिरांवर हल्ले; १० जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेशाचा दौरा संपताच बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. या आंदोलनामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे . कट्टर इस्लामवादी गटाच्या शेकडो सदस्यांनी रविवारी पूर्व बांगलादेशातल्या हिंदू मंदिरांवर आणि एका ट्रेनवर हल्ला केला. मोदींच्या दौऱ्याविरोधात इस्लामी गटांनी आंदोलनं केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक भिडले. यामध्ये १० आंदोलकांचा मृत्यू झाला. मोदींचा दौरा संपताच निदर्शने अधिक हिंसक बनली.

बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. यानंतर ते शनिवारी भारतात परत आले. पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे कोरोनावरील लशींचे 12 लाख डोस सोपवले आहेत.आणि १०९ रुग्णवाहिका सोपवून मोदी भारतात परतले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय भारत आणि बांगलादेशात ५ करार झाले.परंतु मोदींच्या या दौऱ्या नंतर काही कट्टर इस्लामिक लोकांचा आरोप आहे की, पंतप्रधान मोदींनी भारतातील अल्पसंख्याक लोकांसोबत भेदभाव केला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने केली गेली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराचा आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

filmfare | पाहा यावर्षी कोणा कोणाला मिळाली ‘ब्लॅक लेडी’

पाहा १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणारे नियम