in

Bank Holidays | ‘या’ कारणामुळे एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद

नवीन आर्थिक वर्ष 2021-22 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. एप्रिल 2021 मध्ये भारतातील खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 15 दिवस बंद राहतील. विविध बँकांच्या सुट्टीमुळे 9 दिवस बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणून, आम्ही एप्रिल 2021 मध्ये शनिवार आणि रविवारी जोडल्यास एकूण 15 दिवस बँका बंद असतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) वेबसाइटनुसार, एप्रिल 2021 मध्ये बँक सुट्टीमध्ये राम नवमी गुड फ्रायडे, बिहू, बाबू जगजीवन राम यांचा वाढदिवस आणि बरेच काही सणांचा समावेश आहे. तसेच तामिळ नवीन वर्ष आहे. बँकेचा पहिला कार्य दिवस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 3 एप्रिल रोजी असेल. म्हणजेच 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी बँकांमध्ये काम होणार नाही.

बँका का बंद राहणार?

महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी 27 मार्च ते 29 मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद आहेत. त्यानंतर 31 मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद असेल. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी 30 मार्च आणि 3 एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असतील. मात्र, इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांमध्येही बँकांमध्ये कितपत कामकाज होईल, याबाबत शंका आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ईडीची छापेमारी ! कर्नाटकच्या उद्योजकांच्या बंगल्याची झाडाझडती

सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड…; चंद्रकांतदादांचं सूचक विधान