in

येत्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहणार बंद ?

लोकशाही न्यूज नेटवर्क

संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2 सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. या पाश्वभूमीवर बँकांशी संबंधित 9 संघटनांची मुख्य संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU)15 मार्च 2021 पासून देशभरातील सर्व बँकांचा संप पुकारला आहे.

दोन्ही बँकांचे खाजगीकरण केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या योजनेंतर्गत केले जाणार आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये आयडीबीआय बँकेचे एलआयसीकडे विक्री करुन खाजगीकरण केले. याखेरीज मागील चार वर्षांत 14 सरकारी बँकांचे विलीनीकरणही करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या खासगीकरणाबाबतच्या निर्णयांचा कर्मचाऱ्यांवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे त्यांना विरोध करणे आवश्यक आहे. याचं पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत यूएफबीयूने निर्णय घेतला की बँकांच्या सर्व संघटना 15 मार्चपासून 2 दिवसाचा संप पुकारून खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करतील. असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच. वेंकटचलम म्हणाले. यूएफबीयूच्या निर्णयामुळे आता पुढील महिन्यात 15 आणि 16 हे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात 14 तारखेला रविवार आला असल्याने या दिवशी बँकेला सुट्टी असते. पुढील महिन्यात या संपामुळे बँका ३ दिवस बंद राहणार आहेत.

यूएफबीयूमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA),ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC),नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) यांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

म्यानमार का धुमसतंय? लष्करी राजवट कशी लागू झाली?

T- 1 Death Case: सरन्यायाधीशांना हवा; ‘अवनी’ नरभक्षक नसल्याचा पुरावा