in ,

उद्या व्यवहार करून घ्या, शनिवारपासून चार दिवस बँका बंद

राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत कर्मचारी संघटनेने येत्या 15 आणि 16 मार्चला संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकांचे व्यवहार उद्या पूर्ण करावे लागतील.

केंद्र सरकारने मार्च 2017मध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशातील 27 सार्वजनिक बँकांची संख्या 12 झाली आहे. आता दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केला आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (यूएफबीयू) ही दोन दिवसांच्या संपांची हाक दिली आहे. गुरुवारी महाशिवरात्रीमुळे बँकांचे कामकाज बंद होते. तर, दुसऱ्या 13 मार्चला शनिवारची सुट्टी आणि 14 मार्चला रविवार असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

यूएफबीयू ही शिखर संघटना असून यात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बँक एम्प्लॉइज कॉन्फडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय), इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि ‘नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स (एनओबीओ) अशा विविध नऊ संघटना आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कथित हल्ल्यासंदर्भात उर्मिला मातोंडकर म्हणतात, ममता या ‘बंगालची वाघीण’! भाजपा, काँग्रेसची टीका

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB संघातून स्टार खेळाडूची माघार