in

औरंगाबादेत ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले; भाजपमध्ये संताप

सचिन बडे, औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा विभागीय पातळीवर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे पोस्टर फाडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी जागरण अभियान अंतर्गत मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन दुपारी बारा वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यात भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची विशेष उपस्थिती असले. तसेच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी आं. संजय कुटे, ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री रामजी शिंदे सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात आरक्षण वाचवण्यात राज्य सरकार कशाप्रकारे अपयशी ठरले. याच्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे पोस्टर शहरात जागोजागी लावण्यात आले होते. मात्र काही अज्ञातांनी शहरातील सहा ते सात पोस्टर फाडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या या मेळाव्याचे बॅनर अज्ञातांनी नक्कीच द्वेषभावनेतून फाडले असल्याची शंका भाजप नेत्यांनी उपस्थित केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये एमआयडीसीत गॅस गळती; १२ जणांना रुग्णालयात केलं दाखल

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात उदय सामंत यांनी दिली ही महत्त्वाची माहिती