in

कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन

सर्वच जण कोरोनाशी लढत असताना एक सुखाची झुळूक घेऊन आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आलाय. आपल्या लाडक्या बाप्पाच आगमन कलाकारांच्या घरीही झालंय. अभिनेता स्वप्नील जोशी आणि सुशांत शेलार यांचा घरी बाप्पांचे थाटामाटात आगमन झालंय. स्वप्नील जोशी यांच्या घरी गणपती स्थापनेची परंपरा अनेक दशकांपासून आहे.

स्वप्नील जोशी यांच्या घरातील गणपतीची सुरुवात गिरगांवच्या चाळीतल्या घरात सुरु झाली. घर छोट असल्यामुळे कुठूनही बाप्पा दिसला पाहिजे असं त्यांच्या आजोबांचं मत होतं, म्हणून सध्या पद्धतीने, मखराशीवाय बाप्पाचे स्वागत करण्याची परंपरा ते अजूनही पाळतात घरातल्यांच्या सुखशांती सोबतच कोरोनाच्या अंताचा शुभारंभ होउदे असं त्यांनी बाप्पाकडे गाऱ्हाणं घातलं.

अभिनेता सुबोध भावे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन काही झाले आहे. दरवर्षी शाडू मातीपासून घडवलेली मूर्ती बसवण्यात येते. सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने आगमन झाले आहे.सुबोध भावे यांनी टोकियो ऑलम्पिकचा देखावा साकारलय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Alibag, karle

Baramati