वसई – विरार महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने बविआला मोठा धक्का बसला आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे युवा नेते आणि क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख रवींद्र पाठक उपस्थित होते. देशमुख यांच्यासोबत आदिवासी एकता परिषदचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, वंदना जाधव व जन आंदोलन समितीचे गॉडसन रॉड्रिक्स यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीआधी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Comments
Loading…