भारतात आयपीएलचा सामना येत्या 5 दिवसात रंगणार आहे. दुबईत मागच्या वर्षी प्रेक्षकांविना आयपीएलचे सामने खेळले गेले तर यावर्षी हे सामने भारतात होणार आहेत. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल तोंडावर येऊन ठेपली असताना बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बीसीसीआयने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने बीसीसीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावदेखील पाठवला असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
बीसीसीआयने 6 बायो बबल केंद्रांची निर्मिती केली आहे. खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी खेळाडूंची संख्या वाढवण्यात आली आहे, वानखेडे स्टेडियमवरील 10 देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली होती. तर 8 संयुक्त समिती कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे.
दरम्यान, लस घेतल्यानंतर सामान्य नागरिकांनमध्ये अंग दुखी, ताप, डोकं दुखी अशी लक्षणं दिसून येत आहे. त्यातच जर खेळाडूंना लस दिली तर त्यांना काही सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. मुख्य खेळाडू सामने खेळू शकले नाही तर गुणतालिकेत याचा परिणाम नक्की जाणवेल, त्यामुळे बीसीसीआयने योग्य प्रकारे नियोजन करण्याची गरज आहे.
Comments
Loading…