in

BCCI T-20 | बीसीसीआयला टिट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निर्णयासाठी मुदतवाढ

आयपीएल नंतर सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष आता टिट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाकडे लागले आहे. टिट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात घेण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. परंतु भारतात आलेल्या कोरोना दुसऱ्या लाटेमुळे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मग निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका बीसीसीआयची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बीसीसीआयला निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली.

मंगळवारी झालेल्या आयसीसीच्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा उपस्थित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टिट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा भारतात होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह उभे राहिले. बीसीसीआय भातातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल. अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली.

ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. परंतु फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे. याबाबतही आयसीसीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कंकणाकृती सूर्यग्रहणाला भारतीय मुकणार

Petrol-Diesel Price | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर