in

बीड नगर पालिकेत तिघींनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले; आत्मदहनाचा प्रयत्न

बीड : विकास माने | ऑक्टोबर व नोव्हेंबर 2019 चे थकीत वेतन तात्काळ अदा करावे या मागणीसाठी रोंजदारी मजदुर सेनेच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात सुरू होते.यावेळी रोजंदारी मजदुर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलन सुरू असतानाच दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यापैकी तीन महिलांनी स्वतःजवळील बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

आमच्या कामाचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत आणि सीओ साहेब स्वतः आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका महिला आंदोलकांनी घेतली होती.दरम्यान, आज थकीत रोजंदारी न मिळाल्यास उद्या पालिकेला कुलूप ठोकण्याचा ईशारा महिला आंदोलकांनी दिला. आम्ही स्वतः कामे केली आहेत.

गुत्तेदार कोण आहे माहीत नाही, मात्र आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळावा अशी मागणी रोजंदारी महिला आंदोलकांनी यावेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिला गिर्यारोहकांकडून गंगोत्री-1 शिखर सर

IPL 2021 |आबू धाबीत आज MI vs SHR तर दुबईत RCB vs DC सामना