in

‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी साठी बीडमध्ये शिवसेना उतरली रस्त्यावर

बीड : विकास माने | महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना आक्रमक झाली. पहाटे 6 वाजल्या पासून रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेकडून जात आहे.यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक देण्यात आली असून बंद शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे.

लखमीपुर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि याच बंदला यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्याला गुलाबाचं फुल देऊन दुकान बंद करण्याच आव्हान करीत आहेत. यात शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुते, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप बाप्पासाहेब घुगे हे नेते रस्त्यावर उतरून महाराष्ट बंद यशस्वी करण्यासाठी गांधीगिरी मार्गानी रस्त्यावर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा जनतेसमोर – नाना पटोले

नवरात्रीनिमित्त साकारली 340 चौरस फुट रांगोळी