in

विकासकांकडील बेस्टची थकबाकी वसूल करण्यासाठी लवादामार्फत प्रयत्न – मंत्री एकनाथ शिंदे

बेस्ट उपक्रमांची विकासकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, बेस्टच्या अखत्यारितील डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून 533 कोटी रुपये येणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्याकडून 529 कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे 160 कोटी रुपये थकबाकी असल्याचे बेस्ट प्रशासनाने कळविले आहे. व्याजदराच्या अनुषंगाने असणाऱ्या रकमांबाबत व मुख्यत: दंडाच्या रकमांबाबत विकासकांचे बेस्ट उपक्रमाशी मतभेद आहेत. तथापि, ही वसुली करण्याकरिता करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला.

एसआयटीमार्फत चौकशीची मागणी
बेस्टचे डेपो बिल्डरला दिले, त्यावेळी मिळालेला एफएसआय, टीडीआर, कमर्शियल युटिलायझेशन व त्यानंतर शासनाचे नियम बदलल्यानंतर अधिकचे फायदे त्यांनी घेतले. मात्र तरीही विकासक बेस्टचे 160 कोटीं रुपये थकित ठेवत असतील तर, या आर्थिक घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी आग्रही मागणी आशिष शेलार यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतःचं हसं करून घेऊ नये’, अनिल देशमुखांचा टोला

Corona Virus : महामारीच्या काळातील निधी वाटपात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप