in

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला कोरोना सबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे आमदार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात क्लब व पबमध्ये कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या प्रकारावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील क्लब व पबमधील काही व्हिडिओ रविवारी व्हायरल झाले, ज्यामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. या व्हिडीओमध्ये नागरिकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे!” असं नितेश राणे यांनी ट्वीट करून टोला लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोणत्याही परिस्थितीत ‘हा’ शुल्क भरणार नाही ; औरंगाबादमधील व्यापाऱ्यांचा पवित्रा

मुंबईतील ब्लॅक आऊट हा घातपात – गृहमंत्री अनिल देशमुख