in

Bhagat Singh Koshyari | “नेहरूंच्या शांतीदूत प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला”

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अनेक विधानं चर्चेचा विषय ठरतात. कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरू करण्याबाबत लिहिलेलं पत्र असो किंवा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटना, यामुळे कोश्यारी सत्ताधाऱ्यांना कॉन्ट्रोव्हर्सी देत असतात.

अशक्य ते शक्य या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कारगिलच्या विजय दिनानिमित्त प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय.

पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Reliance Jio चा धमाकेदार प्लॅन

Maharashtra vaccination । लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर