in

Dehu Beej Sohala; देहूच्या वेशीवर विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांचं आंदोलन

वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी ‘भजन सत्याग्रह’चा पवित्रा घेतला. या सत्याग्रहात दोनशेच्या जवळपास वारकरी सहभागी झाले असून भर उन्हात तीन तासांपासून आंदोलन करीत आहेत. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर ‘भजन सत्याग्रह’ आंदोलनाची हाक दिली. यासाठी त्यांनी वारकऱ्यांना देहूत यावं असं आवाहन नुकतंच केलं होतं. त्यानुसार आज देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले आहेत. दुपारी तीन वाजल्यापासून ऐन उन्हात बसून वारकरी भजन सत्याग्रह करतानाचे चित्र दिसलं.या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन केलं जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप होणार असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं आहे.

गुन्हे दाखल केले तरी चालतील…

“यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,” असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं. हीच भूमिका कायम असल्याचं आज बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मुलीवर सामूहिक बलात्कार

बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी काढली धींड