in

भंडारा आग दुर्घटना : दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारीका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या घटनेमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या रुग्णालयात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. यासह रूग्णालयात अग्निशमन यंत्रणात अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले होते.

असे काढले होते समितीने निष्कर्ष

भंडारा आग प्रकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले होते. त्यातील एक म्हणजे ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली. या घटनेवेळी स्थानिक अग्निशमन दलाचे पथक वेळेत दाखल झाले होते. दरम्यान, या रुग्णालय इमारतीला फायर एनओसी नव्हती यासह कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणाही उपलब्ध नव्हती. तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही नव्हते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अवकाळी पावसाचा हैदोस… मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई उपनगरात बरसल्या सरी

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा… १०० युनिटपर्यंत सशर्त वीजमाफी?