भांडुपच्या ड्रीम्स मॉल आणि त्यातील सनराईज रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनाने पोलीसांना केली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आग लागल्याचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने देखील कार्यवाही सुरू केली आहे.
ड्रिम्स मॉलमध्ये काल रात्री 12च्या सुमारास पहिल्या मजल्यावर आग लागली. नंतर, या मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुमारे 107 बेडचे सनराईज हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात 78 रुग्ण उपचार घेत होते. पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणात दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. त्यातून निघत असलेल्या धुराने तिसऱ्या मजल्यावरील रुग्णालयाच्या कोविड विभाग तसेच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्ण गुदमरले. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासह रुग्णांची सुटका करुन त्यांना सुरक्षित पद्धतीने जवळपासच्या कोविड रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. अग्निशमन दल, मुंबई पोलीस व इतर यंत्रणांचा सहकार्याने 68 रुग्णांची सुखरुप सुटका करुन त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments
Loading…