in

Bharat Bandh | इंधन दरवाढ, जीएसटी, ई-वे बिलसाठी व्यापाऱ्यांकडून आज भारत बंद

इंधन दरवाढ, जीएसटी, ई-वे बिल या मुद्द्यांवर व्यापाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातील जवळपास 8 कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 40 हजार व्यापारी संघटनांनी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. हा बंद वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या तरतुदींचा आढावा घेण्याच्या मागणीसाठी केला जात आहे.

देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’ने जीएसटीच्या नियमांच्या समिक्षेची मागणी करत शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. तसेच, देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी सुद्धा डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींविरोधात आज भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (SKM) शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्या, फूड सेफ्टी ॲक्टमधील तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी. तसेच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये. या मागण्यांसाठी आज भारतातील अनेक व्यापारी संघटनांनी एक दिवसीय राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंदची घोषणा केली आहे.

या बंदमध्ये लाखो व्यापारी व दुकानदार सहभागी होणार आहेत. या बंदमुळे किराणा व्यापार, माल वाहतूक, मसाले बाजार, भांडी बाजार, सौंदर्य प्रसाधने, मोबाइल व संगणक विक्री या सर्व क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. मुंबईतील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, या बंदमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजदेखील सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.

भारत बंदमुळे कोणत्या सेवा बंद राहणार?

  • भारत बंदमध्ये देशातील 40 हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे बहुतांश बाजारपेठा बंद असतील.
  • देशातील अनेक भागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. AITWA ने वाहतूक कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले आहे.
  • बुकिंग आणि बिलासंदर्भातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
  • चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अ‍ॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदचे समर्थन केले आहे. त्यामुळे या सेवांवर परिणाम होणार आहे.
  • महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
  • जीएसटीमधील त्रुटींचा विरोध करण्यासाठी कोणताही व्यापारी आज पोर्टलवर लॉग इन करणार नाही.

कोणत्या सेवांवर परिणाम होणार नाही?

  • भारत बंददरम्यान अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाजी-पाल्यांचा पुरवठा सुरळीत राहणार.
  • बँकिंग सेवेवरही बंदचा परिणाम नाही

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गरज सरो पटेल मरो; स्टेडियमवरून शिवसेनेची मोदींवर टीका

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त; एका महिलेला अटक!