in

भरधाव ट्रकची मिठाईच्या दुकानाला टक्कर; अपघातात 16 जणांना चिरडलं

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने अनेक लोकांना धडक दिली आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला होता. तर गावातील संतप्त नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून बराच काळ गोंधळ घातला आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन परिसरातील सरकारी मालमत्ता आगीच्या हवाली केली आहे, तर जखमी लोकांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.

तेल्हाडामधून सर्व मृतदेह शरीफ सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. नालंदाचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या आदेशानुसार मृतांच्या कुटूंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी 44 लाखाचा धनादेश सूपुर्द केला आहे. ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघात आणि 7 जणांच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने ट्रकला पेटवले. लोकांना शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने तेल्हाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांनाही पेटवून दिले. या अपघातात गंभीर जखमी असलेल्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स!

केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर; नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ