in

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय खळबळ सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे. अशातच नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी फळी तयार झाली आहे. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पाहायला मिळतो. अशातच नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर निश्चित विजयी होणार, आमचा त्यांना पाठिंबा आहे अशी घोषणा भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली आहे. इतकंच नाहीतर आपण भाजपचा राजीनामा देणार असून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-आग्रा महामार्गावर खर्डी जवळ अपघात, 5 जण गंभीर जखमी

जळगाव जिल्हयात पावसाची दमदार सुरुवात