in

भूपेंद्र पटेल आज घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या एक वर्ष आधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काल झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. ते यापूर्वी अहमबाद शहर विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते.

मात्र आता भूपेंद्र पटेल हे आज दुपारी १ वाजत मुख्यमंत्रीपदाची ( Bhupendra Patel to take oath tomorrow) शपथ घेतील, असं सांगण्यात येत आहे. पण उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप भाजपकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत. तसंच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. राज्यात जी विकासकामं सुरू आहेत, ते पुढे नेली जातील. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असं भूपेंद्र पटेल म्हणाले. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, भूपेंद्र पटेल हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवानात दाखल झाले आहेत.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते आहेत. पाटीदार समाजात त्यांची मोठी पकड आहे. जमिनीशी जुळलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. भाजपसाठी पटेल मतदारांना सांधण्यात ते यशस्वी होऊ शकतात. अहमदाबादच्या शिलाज भागात राहणारे भूपेंद्र पटेल यांनी सिव्हील इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे अतिशय निकटवर्ती मानले जातात. आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी निवडणूक लढवली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका