in

अफगाणिस्तानच्या परिस्थितीला बिडेन जबाबदार -डोनाल्ड ट्रम्प

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिडेन प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना जबाबदार धरले आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रम्प प्रशासनाने तालिबानसोबत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा करार केला होता. मात्र, आता अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाचे वर्णन अत्यंत दुःखद केले आहे. दरम्यान, रिपब्लिकन सिनेटर मिच मॅककोनेल यांनी बिडेन प्रशासनाची चाल धोकादायक आणि भयावह असल्याचे म्हटले आहे.

त्याचवेळी अमेरिकन माध्यमांनीही जो बिडेन यांच्या अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर टीका केली. वॉशिंग्टन पोस्टने लिहिले आहे की, बिडेनच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानचे नुकसान झाले आहे असा आरोप केला आहे…

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानच्या युद्धग्रस्त प्रदेशातून आपले उर्वरित सैनिक माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 90 टक्क्यांहून अधिक अमेरिकन सैन्य मागे घेण्यात आले आहे.

यापूर्वी, बिडेन यांनी त्यांच्या निर्णयावर म्हटले होते की पाहा, आम्ही 20 वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला आहे. आम्ही 300,000 पेक्षा जास्त अफगाण सैन्यांना प्रशिक्षण दिले आणि सुसज्ज केले. या दरम्यान आम्ही हजारो अमेरिकन सैनिक गमावले.

अफगाणिस्तानला आता आपल्या देशासाठी स्वबळावर लढावे लागेल आणि त्यासाठी अफगाण नेत्यांना एकत्र यावे लागेल असे बिडेन यांनी वक्तव्य केले होते…

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानातून १२९ प्रवाशी सुखरूप भारतात…

मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा