in

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी राजीनामा दिला. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन, रावत यांनी आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे आता उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालीय.

उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद मिळणं हेच माझं सौभाग्य होतं. पक्षाकडून मला इतका मोठा सन्मान मिळेल, याचा कधी विचारही केला नव्हता. मुख्यमंत्री कार्यकाळाला चार वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ नऊ दिवस बाकी आहेत. परंतु, आता मुख्यमंत्री बनण्याची संधी दुसऱ्यांना द्यावी, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. यानुसार मी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. पक्षाकडून चार वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल पक्षाचे आभार. उत्तराखंडच्या नागरिकांचे खूप आभार…’ असं रावत यांनी राजीनामा सोपवल्यानंतर एका पत्रकार परिषदेला सामोरं जाताना म्हटलं.

मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठक ही दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली. या भेटीअगोदर त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. दरम्यान नड्डांसोबत त्याची जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर न देता ते दिल्लीसाठी रवाना झाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tech Update : व्हॉट्सअ‍ॅप वापरताय ? ही बातमी तुमच्याचसाठी

मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास, डेलकर कुटुंबीय