गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस 14व्या सीझनची विजेता ठरली आहे. तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे.
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यामुळे विजेती रुबीनाच्या वाट्याला 44 लाख रुपये आलेत. ज्यावेळी राखी घराबाहेर पडली त्यावेळी सलमानने राखीला विचारले होते की, तुला काय वाटते बिग बॉस कोण जिंकेल त्यावेळी रूबीना जिंकली पाहिजे, असं मला वाटतं असं राखी म्हणाली होती.
बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात सलमान खानने आपल्या शैलीत केली. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच अभिनेता रितेश देशमुख देखील बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होता.
Comments
Loading…