in

पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाचा जोर ओसरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. जवळपास दोन वर्षानंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे.पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत.

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs NZ, Live 1st Test, Day 1 : श्रेयस अय्यरनं पदार्पणातचं झळकावलं अर्धशतक

IND vs NZ 1st Day | पहिल्या दिवसअखरे भारताच्या ४ बाद २५८ धावा