in

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कथित भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात पीएमएलए विशेष कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एकनाथ खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं

ATMमधून पैसे चोरणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक