in ,

BIGG BOSS 3: हे कपल पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यात रोज नवा ड्रामा आणि स्पर्धकांचे नवे कारनामे पाहायला मिळत आहेत. या सिजनमध्येही इंटरटेनमेंटचा फुल डोस प्रेक्षकांना मिळत आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तीचा पहिला पती आविष्कार दारव्हेकर या दोघोंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या आहेत.

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेखा कुडची अविष्कारला एकटे वाटून घेऊ नकोस. आपण सर्व एकत्र आहोत असे बोलताना दिसत आहेत. त्यावर विशाल स्नेहा बसलेली असते तिकडे इशारा करत एकदा तिकडे बघ असे म्हणतो. त्यानंतर अविष्कारला रडू कोसळते आणि तो स्नेहाला जाऊन मिठी मारतो. सध्या बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा वर्तवली जात आहे. हे दोन सदस्य कधीकाळी पती-पत्नी होते. पण आता त्यांच्यात घटस्फोट झालेला आहे. स्नेहा आणि आविष्कार इमोशनल होऊन एकमेकांना मिठीत घेऊन रडताना दिसून आले.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सेलिब्रिशेनचा मूड दिसणार आहे. कारण देखील तसे खासच आहे. काल ४ ऑक्टोबर रोजी घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस होता आणि त्याचनिमित्ताने सगळ्या सदस्यांनी तिचा वाढदिवस एकत्र येऊन साजरा केला. तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्या वतीने तिला छानसे गिफ्ट देखील दिले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सणासुदीच्या दिवशी, कोणाचा वाढदिवस असेल तर गोडधोड पदार्थ खाण्याची संधी सदस्यांना मिळते आणि त्याचा आनंद या सदस्यांच्या चेहर्‍यावर दिसून येतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नांदेडमध्ये आर.के.मेडिकल एजन्सीला भीषण आग

मनी लाँड्रिंग प्रकरणी रमेश चंद्र, प्रीती चंद्रा यांना अटक