in

‘बिग बॉस’ फेम अर्शी खानच्या गाडीचा भीषण अपघात

बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध अभिनेत्री अर्शी खानच्या गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ती गंभीररित्या जखमी झाली असून तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अर्शी खान ही दिल्लीत चित्रीकरणासाठी आली होती. यावेळी तिच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात दिल्लीतील शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाल्याचे बोललं जात आहे. या अपघातात अर्शी ही गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्शीच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु आहे.दरम्यान या अपघातानंतर अर्शीचे अनेक चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST workers Strike : शरद पवारांसोबतची बैठक संपली, विलीनीकरणाबाबत अनिल परब म्हणाले…

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह