in

Bigg Boss Marathi 3 ; एलिमिनेशन राऊंड सुरु; अक्षय वाघमारे बाहेर…

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.

शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोन मध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले.तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? सदस्यांना कोणते टास्क मिळणार? हे बघणे रंजक असणार आहे.महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर अक्षयने घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा तो म्हणाला, “मी सर्वात जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस कारेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये रहाण खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळालो”. 

बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नैतिकता असेल तर शेतकऱ्यांना पॅकेज घोषित करा – देवेंद्र फडणवीस

पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद