in

बिग बॉस मराठीची उत्सुकता शिगेला; कोण असणार स्पर्धक?

रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ ३ आपल्या भेटीला येणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून या पर्वाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी कोणते स्पर्धक असणार याबद्दल सगळ्यांच उत्सुकता लागून राहिली आहे.

शोला रंजक बनवण्याचं काम करणारे शोचे होस्ट महेश मांजरेकर यावेळी दिसून येणार कि नाही याबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र शोचा प्रोमो समोर आल्यानंतर हि हि चिंता दूर झाली होती. त्यामुळे येणाऱ्या नवीन सीझन बद्दल चाहत्यांना जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे.तत्पूर्वी अशी चर्चा आहे, कि ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन ३ मध्ये अभिनेत्री गायत्री दातार, संग्राम समेळ,नेहा जोशी, शाल्मली खोलगडे, आनंद इंगळे, चिन्मय उदगीर, पल्लवी सुभाष हि मराठीतील तगडी मंडळी यावेळी शोमध्ये दिसून येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.मात्र याबद्दल अजूनही कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही.

तर नुकत्याच झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत देखील या बद्दल काही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ४ दिवसांवर आलेल्या शोची प्रक्षकांमधील उत्सुकता आणखीनच शिगेला गेली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“तर मी तुमचा ‘चढ्ढा’ उतरवेन…”, AAP नेत्यावर भडकली राखी सावंत

राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा!