in

बिग बॉस मराठीच्या घराला मिळाले टॉप १० सदस्य; ‘ही’ स्पर्धक बाहेर!

मुंबई | बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला. कारण घराला टॉप १० सदस्य मिळाले होते. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले. घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष गायत्रीवर नाराज होते. तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील भांडण झाले आहे. दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्याने मीरा आणि विशालला कारागृहाची शिक्षा भोगावी लागली. गायत्री दातार घराची कॅप्टन बनली.

हे सगळं घडत असतानाच घरामध्ये काही खास पाहुण्यांची एंट्री झाली आहे. घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये वूटद्वारे आलेल्या फॅन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, सोनालीला सांगितली. तर दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये वूटद्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले. कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले. आज मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘परमबीर यांच्या जिवाला मुंबई पोलिसांकडून धोका, ते भारतातच’; वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय