in ,

Bigg Boss Marathi 3; गायत्रीच्या भावाकडून तिच्या खेळाचे कौतुक अन् मोलाचा सल्ला…!

मुंबई | बिग बॅास मराठी ३’ चा खेळ आता दिवसेंदिवस अधिकच रंगतदार, आव्हानात्मक होत चालला आहे. भांडणे, काळजी, प्रेम, घरची आठवण अशा संमिश्र भावना स्पर्धकांकडून व्यक्त होत असतानाच बिग बॅासच्या घरात यावेळी फॅमिली वीक साजरा करण्यात आला. घरापासून, आपल्या जवळच्या व्यक्तींपासून इतके दिवस दूर राहिल्यामुळे साहजिकच स्पर्धकांना त्यांच्या घराची ओढ लागू लागली आहे. म्हणूनच खास या आठवड्यात बिग बॅासच्या घरात स्पर्धकांच्या नातेवाईकांनी हजेरी लावली.

या वेळी गायत्री दातारचा भाऊ सिद्धार्थ, वहिनी हर्षदा आणि भाचा वेदांगने तिची भेट घेतली. त्यांना भेटून गायत्री खूपच भावूक झाली. भाच्याला भेटून गायत्रीला खूप आनंद झाला. या वेळी गायत्रीच्या भावाने तिच्या खेळांचे कौतुक करत तिला मोलाचा सल्लाही दिला.त्याने तिला ग्रुपमध्ये न खेळता एकटीने खेळण्यास सांगितले. स्वतःचा विचार, मत मांडून आणि त्यानुसार खेळण्यास सांगितले. या फॅमिली वीकमध्ये सर्वांचेच नातेवाईक भेटायला आल्याने भावूक झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पसरणी घाटामध्ये दरड कोसळली, वाहतूक धीम्या गतीने सुरू

पुण्यात रंगणार ”लोकशाही पुणे रत्न सन्मान” सोहळा, राजकियसह सामजिक क्षेत्रातील दिग्गजांची असणार उपस्थिती