in

Bigg Boss Marathi 3 चा विजेता विशाल निकमची ‘सौंदर्या’ आली समोर, सोशल मीडियावर ‘या’ नावाची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू असताना अनेकदा विशालच्या बोलण्यामध्ये सौंदर्या हिचा उल्लेख आला होता. त्यामुळे ही सौंदर्या नेमकी कोण आहे, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अनेकदा विचारूनही विशालने याबाबतचा खुलासा आजपर्यंत कधीच केला नाही. योग्य वेळ आल्यावर या गोष्टीचा खुलासा करेन हेच वारंवार विशालने सांगितलं होतं. त्यामुळे सोशल मीडिया युझर्सही त्यांच्यापरिने सौंदर्या शोधत होते. आता अशी चर्चा आहे की युझर्सना विशालची ही सौंदर्या मिळाली आहे.

नुकतेच त्याने काही व्हिडीओ व फोटो शेअर केले आहे. हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक तरुणी दिसत आहे, अक्षया हिँदळकर आणि विशाल निकम हे दोघे ही “साता जन्माची रेशीम गाठ” मालिकेत काम करत होते.

या मालिकेत अक्षयाने श्रुती‌ ही भूमिका साकारली होती. त्यामुळे आता विशाल निकम याची सौंदर्या नेमकी हीच आहे का? असा सवाल केला जात आहे. हा फोटो व्हायरल होत असल्याने विशाल निकम याची सौंदर्य हीच आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे. मात्र, विशाल निकम याने याबाबत अजून तरी खुलासा केलेला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 442 जणांचा मृत्यू तर ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही वाढ

वर्ध्याचे खासदार रामदास तडस कोरोना पॉझिटिव्ह