in

पहा, कसं आहे यंदा बिग बॉस मराठीच घर

बहुचर्चित रिॲलिटी शो लवकरच आपल्या भेटीला येत आहे. कोरोनानंतर २ वर्षांनी हा शो चाहत्यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये कोण स्पर्धक असणार ते बिग बॉसचं नवं घर कसं आहे? या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे.=नुकताच बिग बॉस सीजन ३ च्या घराचे इन्साईड फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. स्पर्धकांना आपलस वाटावं, यासाठी बिग बॉस सीजन ३ मध्ये घराला मराठमोळा टच देण्यात आला आहे. यावर्षीची थीमच मराठमोळी आहे. त्यामुळे लोकांना कुतूहल निर्माण झालं आहे.

हे काही फोटो आहेत ज्यामधून या घराची झलक चाहत्यांसमोर आली आहे. चाहत्यांना घराची थीम प्रचंड आवडेल असंही मेकर्सचं म्हणणं आहे. सर्व लोकांना पाहताना हे आपलंस वाटेल.या फोटोमध्ये एक जेल अर्थातच कैदखाना, स्पर्धकांना विश्रांतीसाठी झोपण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्थाही अत्यंत खास आहे. यामध्ये खूपच आकर्षक पिवळ्या रंगाचे बेड दिसून येत आहेत. शिवाय घराला काही पेंटिंगने सजवणायत आलं आहे, झोपण्याची व्यवस्था, किचन रूमसुद्धा अत्यंत खास आहे.

स्टोअर रूम सुद्धा अत्यंत आकर्षक बनवली आहे. त्याच्या भिंतींवर छान अशी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.सीटिंग एरियाला देखील अगदी मराठमोळा टच आहे. मागे भिंतीवर काही नाटकांची नाव देखील लिहिण्यात आली आहेत.एक काचबंद रूम त्यात सुंदर असं बेड आणि झोपण्याची व्यवस्था हे काहीतरी खास असणार हे नक्की. बैठक व्यवस्थेमध्ये पारंपरिक टच असणारे शो पीस आणि झुंबर वर लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे खास सिजनची हि खास व्यवस्था करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”आता तर चक्क कोथळा काढायची भाषा वापरली जाते”

ओ गुरु…. नवज्योतसिंग सिद्धूंसह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी चौघे?