in

Watch Video; नियंत्रण सुटलेली बाईक थेट घुसली दुकानात…

अभिजीत हिरे, भिवंडी | भिवंडीत चालकाने गेयर मध्येच बाईक सुरू केल्यावर नियंत्रण सुटलेली बाईक दुचाकीस्वारासह थेट दुकानात शिरल्याची घटना भिवंडी शहरातील वंजारपट्टी पटेल नगर या परिसरात घडली आहे .या घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झक्याने ही घटना समोर आली आहे.

पटेल नगर येथे हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ असून त्या दुकानातील कामगार दुकानाच्या काऊंटर वर उभा असताना बारा वाजताच्या सुमारास दुकाना समोर उभी असलेली बाईक चालकाने गेयर मध्ये बाईक सुरू केली असता ती लागलीच सुरू झाली तिचा वेग अधिक असल्याने त्याने ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक्सलेटर जोरात फिरविल्याने बाईक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाईकस्वारा सह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली या मध्ये दुकानातील डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान झाले परंतु कामगाराने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली आहे .या घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली असून ती समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पंच प्रभाकर साईल विरोधात पोलिसात तक्रार

Prabhakar Sail | प्रभाकर साईल यांना एनसीबीकडून समन्स