in

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावरही येणार बायोपिक

चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवरील चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहेत, याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत. यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावरही बायोपिक बनणार आहे. यानंतर या यादीत आणखी २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी मध्ये काम करणारे निळु फुळे यांचावर बायोपिक लवकर येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्यावर आता बायोपिक बनणार असल्याची माहिती समोर येतेय.

कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. एवढचं काय तर त्यांनी निळू यांची लेक गार्गीकडून या चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत. कुमार तौरानी यांनी निळू फुळे त्यांनची मुलगी गार्गी फुळे यांच्याकडून बायोपिक बनवण्यासाठी परवांगी घेतली आहे. या वर्षी या प्रोजेक्टला सुरवात होईल. तर या बायोपिकमध्ये निळू हे एक अभिनेता स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला त्यांचे जीवन कसे होते ते पाहायला मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर

India vs South Africa LIVE Score, 3rd Test, DAY 2: दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा