आजकाल बर्थ डे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करणे हा तर ट्रेंडच झाला आहे. मात्र अनोखे सेलिब्रेशन करणे कधी कधी महागात पडते. या घटनेतही असेच झाले आहे. वाढदिवसाचा केक कापायला गेलेल्या बर्थ डे बॉयचा चेहरा जळाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मित्रांचा ग्रुप मिळून वाढदिवस साजरा करत असतो. यावेळी केक कापण्यासाठी तरूण चाकू घेतो. इतक्यात सर्व मित्रमंडळी त्याच्या चेहऱ्यावर स्नो स्प्रे स्प्रे करते. त्याचवेळी केकवर स्पार्कलर कॅंडल जळत असते. दरम्यान या स्नो चा आणि कॅंडलच संपर्क होऊन मोठा भडका उडतो. यामध्ये तरुणाच्या चेहऱ्याला आग लागते. तो आग विझवण्याचा प्रयत्न करतो,मात्र तिथपर्यत चेहरा जळतो आणि त्याला गंभीर दुखापत होते.
दरम्यान तरुणांनी जर असे सेलिब्रेशन करायचे असेल तर त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा त्यांच्यासोबतही हि घटना घडण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…