in

मिस्टर टी-२० म्हणून ओळख असणाऱ्या सुरेश रैनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

सर्वात प्रिय भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक असलेला सुरेश रैना आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. २७ नोव्हेंबर १९८६ रोजी मुराद नगर, उत्तर प्रदेश येथे रैनाचा जन्म झाला. घरच्या घरी सोनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी मिस्टर टी-२० म्हणूनही ओळखले जाते! त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी सहसा माहित नसलेल्या गोष्टींवर एक नजर टाकूया…

सुरेश ने २००५ साली वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनी कसोटी क्रिकेटात प्रवेश २०१० म्हणजेच पाच वर्षानंतर याच संघाविरुद्ध केला होता. याच सामन्यात त्यांनी शतक झळकावले होते.

 • २०११ मध्ये झालेल्या विश्व कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते प्रमुख सदस्य होते.
 • सुरेश रैना यांचे वडील उत्तर प्रदेश मध्य मुर्दानगर येथील आयुधनिर्माण कारखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आईचे नाव परवेश रैना आहे.उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद शहरातील राजनगर मध्ये ते राहतात. त्यांचे तीन लहान भाऊ आहेत. दिनेश रैना, नरेश रैना, आणि मुकेश रैना. त्यांना एक मोठी बहीणसुद्धा आहे.
 • सुरेश रैना यांचा एक लेख २०१२ मध्ये “राहुल द्रविड : टाईमलेस स्टील” या पुस्तकात प्रकाशित केला गेला.
 • सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपलब्धी :
 • टी-२० मध्ये शतक झळकावनारे तिसरे फटकेबाज फलंदाज.
 • क्रिकेट मधील तीनही प्रकारात शतक झळकावणारे पहिले भारतीय.
 • कसोटी प्रकारात पहिल्या सामन्यातच शतक झळकावणारे १२ वे भारतीय फलंदाज.
 • टी-२० करियर मध्ये ६००० पेक्षा जास्त धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू.
 • देशातील क्रिकेट स्तरावर
 • IPL मध्ये सर्वाधिक ३००० धावा झळकावणारे पहिले खेळाडू.
 • IPL मध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.
 • IPL मध्येच १०० पेक्षा जास्त षटकार मारणारे पहिले भारतीय फलंदाज आणि विश्वातील दुसरे फलंदाज.
 • IPL सीजन मध्ये ४००० पेक्षा जास्त धावा बनवणारे पहिले व एकमात्र फलंदाज.
 • IPL, CLT२० आणि टी-२० यामध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज.
 • IPL च्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक फलंदाजीच्या सरासरीचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.
 • ४ ऑक्टोबर २०१४ मध्ये CLटी-२० मध्ये सर्वाधिक धावा झळकावणारे पहिले फलंदाज तेच आहेत.
 • IPL संघ चेन्नई सुपरकिंग कडील सर्व सामने ते खेळले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rain Alert ; 29 व 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हयात पावसाची शक्यता

कुंभार्ली घाट बनला मृत्यूचा सापळा