in

बिटकॉइन किमतीचा उच्चांक

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये तब्बल १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. एलन मस्क यांच्या प्रचंड गुंतवणुकीमुळे बिटकॉइनच्या किंमतीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बिटकॉइनची किंमत सोमवारी ४४ हजार डॉलर्सने वाढली.

कोरोनाच्या काळात बिटकॉइनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सन २०२१ वर्षाच्या सुरुवातीनंतर आता बिटकॉइनच्या किंमतीत ५० टक्क्यांची नोंदवण्यात आली आहे. टेस्लाच्या या गुंतवणुकीनंतर बिटकॉइन किंमतीमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

भविष्यात टेस्लाची उत्पादने आणि वाहने खरेदी करणाऱ्यांकडून बिटकॉइनच्या स्वरुपात पैसे स्वीकारले जाऊ शकतात. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणारी टेस्ला सर्वांत मोठी कंपनी बनली आहे. एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल पेजवर बिटकॉइनचा हॅशटॅग अॅड केला होता. यांच्या एका ट्विटनंतर अनेक कंपन्यांच्या समभागात तेजी आल्याचे पाहायला मिळाले.

बिटकॉइन म्हणजे काय ?
दरम्यान, बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा अन्य चलनाचा वापर ज्या पद्धतीने केला जातो, तशाच पद्धतीने पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेता निर्माता राजीव कपूर यांचं निधन

IND vs ENG 1 Test |भारताचा 227 धावांनी पराभव