in

चोरीची अजबच घटना; स्मशानभूमीतून राखचं चोरली

उस्मानाबादेत थेट स्मशानभूमीतून राख चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नेमकी राख का चोरली असेल, त्याचा चोरांना काय फायदा असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात हा अंधश्रद्धा, जादुटोण्याचा तर प्रकार नाही ना असा संशय येतोय. पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना बेड्या ठोकल्या तर काही फरार आहेत.

परांडा तालुक्यात चार बाहदरांनी कुठल्या बॅकेत नाही…कुठल्या बंगल्यात नाही…तर थेट स्मशानभूमितच दरोडा टाकलाय…आणि स्मशानभूमितून चक्क प्रसूतीनंतर मृत पावलेल्या महिलेची राख चोरी केलीय. या अजब प्रकारामागचं नेमकं कारण काय? हा जादुटोण्याचा प्रकार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अंधश्रद्धा, जादुटोण्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येतायत.आता या प्रकरणातही अशी काही माहिती समोर येतेय का हेही पाहणं महत्वाचं आहे.मात्र सौभाग्यवतीच्या अंगावरील दागीने राखेत आढळून येतात.त्या दागिण्याच्या चोरीसाठीही हा प्रकार घडून आल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी यातल्या काही जणांना बेड्या ठोकल्या तर काही जण फरार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs Eng 3rd Test: पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 99 धावा

‘कोरोना चाचण्या वाढवा, बाधितांचा संपर्क शोधा’