in

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेचे निधन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे निधन झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान या घटनेने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

अर्चना बारणे यांनी कोरोना काळात अनेक उपक्रम राबवली आहेत. कोरोना काळात सर्वाधिक अॅक्टीव्ह नगरसेविकांमधल्या त्या एक होत्या. अर्चना बारणे यांना डेंग्यू झाला होता. या आजारावर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने पिंपरी चिंचवडमधील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगली मनपा क्षेत्रात पाच दिवस कडक निर्बंध, जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन

Maharashtra Unlock | राज्यात लवकरच ‘ओपनिंग अप’