in

वर्ध्यात भाजपला धक्का; नगरसेवकासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

भूपेश बारंगे । वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेचे भाजप नगरसेवक रामू राठी यांना पक्षातून निष्काशीत करण्यात आल्याने उद्या शेकडो कार्यकर्त्यासह ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पशुसंवर्धन मंत्री व पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढी विरोधात कारंजा ते आर्वी पर्यंत जवळपास 35 किलोमीटर सायकल रॅली काढून केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केले. जवळपास या रॅली मध्ये शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने आर्वी मतदारसंघात भाजपची पायाखालची वाळू सरकली होती. त्यातच आर्वी मतदारसंघात काँग्रेसचा वाताहत झाली असल्याने काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी पक्ष संघटन करणे गरजेचे असल्याने सध्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे. याठिकाणी पक्ष बळकट करण्यासाठी आता माजी आमदार अमर काळे कामाला लागलेलं आहेत.

आर्वी मतदार संघाचे भाजप आमदार दादाराव केचे यांचे निकटवर्तीय असलेलं आर्वी नगर परिषदेचे भाजप नगरसेवक रामू राठी हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार अमर काळे उपस्थितीत होणार आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्परची टॅक्सीला धडक;दोन जण गंभीर

उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींना धमकीचे पत्र; शिवसैनिक आक्रमक