in ,

…म्हणूनच महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?, भाजपाचा शिवसेनेला सवाल

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालय आगप्रकरणी भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते, याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाइकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉलवर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

या मॉल व हॉस्पिटल च्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व हॉस्पिटल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची सुद्धा सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्यासाठीची मागणी मी वारंवार केली होती. त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये 1390 रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरू असल्याचे तसेच तेथे कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते. इतकेच नव्हे तर, मुंबई महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 29 मॉलमध्ये अग्नीरोधक व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते, आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता, असे भातखळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची मदत करण्यात यावी व ही रक्कम मॉल व रुग्णालयाकडून वसूल करावी, अशी मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत NCB ची मोठी कारवाई 2 कोटींचे ड्रग्ज जप्त

महिला अधिकाऱ्याची आत्महत्या प्रकरण आणखी तापलं