in

नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची मागणी

संदीप गायकवाड
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात कारवाही करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करीत, तपास यंत्रणेत अडथळा निर्माण करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करा – अशी मागणी वसईत भाजपने केली आहे.

भाजपाचे वसई विरार शहर जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दाखल केले आहे.

‘समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकणार, वर्षभरात नोकरी घालवणार, तुरुंगवास निश्चित, अशा प्रकारच्या धमक्या देणे, त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करणे, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मंत्री पदावर असताना एका उच्यपदस्थ शासकीय अधिकाऱयांना धमकी देणे ही बाब गंभीर आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा’ अशी मागणी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भरधाव ट्रकनं आंदोलक शेतकरी महिलांना चिरडलं; ३ मृत्यू तर ३ जखमी

आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र