in

राज्यातील पोलिसांना कडक आदेश दिले असते ; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना आणि राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं होतं. या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत उत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

‘राज्यपालांना एखादं शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्या शिष्टमंडळाच्या मागण्या मांडणारे पत्र राज्यपाल लिहीतच असतात. राज्यापालांना आदेश देण्याचा किंवा मागण्या फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे. शक्ती कायदा करण्यासाठी २ दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं, या मागणीसाठी १३ आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. या शिष्टमंडळाने ज्या मागण्या केल्या त्याबाबतच राज्यपालांनी पत्र लिहिलं होतं.

मी गेल्या २५ वर्षांपासून पाहतोय, जेव्हा एखादं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटतं तेव्हा राज्यपाल पत्र लिहितात किंवा फॉरवर्ड करतात. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने अशा प्रकारची अपरिपक्वता दाखवण्यापेक्षा राज्यातील पोलिसांना कडक आदेश दिले असते आणि शक्ती कायदा लवकर करण्याचा प्रयत्न केला असता तर ते अधिक संवदेनशील दिसलं असतं,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप नाही,पण राष्ट्रहितासाठी आम्ही दबाव टाकतो – मोहन भागवत

Viral Photo| जेव्हा समीर चौघुले समोर अभिनयाचे बादशहा आदराने झुकतात!