भाजपा सरकारला पक्षातीलच एका नेत्यानं घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी कोणतीही तडजोड करू शकतो, असा घणाघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी केला आहे. त्यांनी भाजपाला घरचा आहेर देत पक्षाच्या आताच्या धोरणांवर टीका केली.
भारतीय जनता पक्ष आज प्रदुषणाचा बळी पडत आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. राजकीय प्रदुषणाचा माझ्यासारख्या काही लोकांना अतिशय त्रास होत आहे. आम्ही काम करून वाढवलेला हाच भाजपा आहे का, असा प्रश्न मनात येतो, असेही शांता कुमार म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपावरील लक्ष कमी केलं आहे. भाजपाला आरएसएस नेहमी मार्गदर्शन करत असे. मात्र आता संघाचं हळूहळू दुर्लक्ष होत आहे. यामुळे पक्षाची चिंता वाटते, असेही शांता कुमार यांनी म्हटलं आहे.
सध्या राजकारण भरकटलेलं आहे. संपूर्ण विचारधार दिशाहिन झाली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी दंगली घडवल्या जातात. नेत्यांची सर्रास खरेदी-विक्री सुरू आहे. संपूर्ण देशात भ्रष्ट राजकारण सुरू असताना भाजपाच केवळ शेवटचा आशेचा किरण असल्याचं मत शांता कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
Comments
Loading…